India vs New Zealand, 1st Test day-2: न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची दाणादाण ! अवघ्या 46 धावांवर टीम इंडिया ऑलआउट

India vs New Zealand 1st Test day-2 : बांगलादेशविरुद्ध शेर असणारे भारतीय खेळाडू न्यूझीलंडसमोर 46 धावांत ढेर झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत भारतीय क्रिकेट संघ सरेंडरच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आले.

पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर चाहत्यांना टीम इंडियाकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा होती, पण दुसऱ्या दिवशी पहिल्या-दोन सत्रात जे काही घडले, ज्यामुळे बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या उभारली.

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो एकदम चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. न्यूझीलंडच्या धोकादायक गोलंदाजीसमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोलमडताना दिसली.

अर्धा संघ शून्यावर बाद

बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर भारतासमोर आता न्यूझीलंडचे कडवे आव्हान आहे. बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांची धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. भारताचे पाच फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना दुसऱ्या दिवशी खातेही उघडता आले नाही. उपाहारानंतर फलंदाजीला आलेला आर अश्विनही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि खातेही न उघडता बाद झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 17-10-2024