मंडणगड नगरपंचायतीतर्फे स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीने यंदा स्थानिक प्रजातींच्या दहा हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा असलेली मोकळी जागा, खासगी मालकीची मोकळी जागा, शासकीय जागा, विकसकांच्या जागेतही वृक्ष लागवड आणि संगोपनाचे नियोजन केले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी दिली.

नगरपंचायतीने निर्धारित केलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नगरसेवक, सामाजिक संस्था, युवा मंडळे, सांस्कृतिक संघटना व नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून २५ जुलै रोजी बोरीचा माळ येथे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुख्याधिकारी अभिजित कुंभार, अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक आदेश मर्चडे, नगराध्यक्षा नगरसेविका सेजल गोवळे, महेश दळवी, सागर कारंडे, मनोज मर्चेंडे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 01/Aug/2025