कोंडगाव येथे विद्युतवाहिनीवर झाडाच्या फांद्या

संगमेश्वर : तालुक्यातील कोंडगाव येथील दत्तदर्शन पथ ते भडकंबा रोडवर विद्युतवाहिनीला झाडाच्या फांद्या स्पर्श करत आहेत. तसेच बाजारपेठेतही हाच प्रकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. झाडांच्या फाद्यांची वाढ झालेली असून, जंगलभाग वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये हे चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कोंडगाव येथील दत्तदर्शन पथ ते भडकंबा रोडवर आणि बाजारपेठ परिसरात महावितरणच्या वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थ रमाकांत पाटेकर यांनी अर्जही दिला होता. त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या परिसरातील काही विद्युतवाहिनी झाडाझुडपांच्या अगदी जवळ आलेल्या आहे. काही ठिकाणी विद्युतखांबावरही वेलींचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक ठिकाणी रोड ओलाडण्याच्या ठिकाणी गार्डिंग केलेले नाही. याकडे महावितरण विभाग डोळेझाक करत आहे. या प्रकारांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

तीन जणांनी गमावला जीव
साखरपा जाधववाडी येथे काही व दिवसांपूर्वी घराजवळ तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीने महिलेचा जीव घेतला होता. तालुक्यातही निवळी येथे दोघांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी वायरमनवरही गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 07/Aug/2025