लांजा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शांतता, सुरक्षितता आणि सुरळीत सेवा प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने लांजा तालुका प्रशासनाची बैठक नुकतीच लांजा तहसील कार्यालय येथे शासकीय यंत्रणा व विविध संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.
तहसीलदार प्रियांका ढोले व लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांनी गणेश उत्सव सुरू होणार असून उत्सव काळात प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी चर्चा करण्यात आली.
रिक्षा चालक-मालक यांना पार्किंग व्यवस्थेसंदर्भात महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल, अशाप्रकारे रिक्षा लावू नयेत. तसेच गणेशोत्सवानिमित्त भाविकांकडून जास्त भाडे आकारण्यात येऊ नये. पार्किंगकरिता जागा ठरवण्यात आली.
यासह खासगी बस मालक तसेच ट्रॅव्हल्स एजंट यांना भाविकांना ये-जा करतेवेळी तसेच खासगी बस यायचेवेळी रस्त्यावर गर्दी होऊ नये याकरिता त्यांना पार्किंग ठरवून दिली. तसेच त्यांच्या अडीअडचणी बाबत विचारणा करण्यात आली. लांजा शहरातील किरकोळ विक्रेते फेरीवाले यांना वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे आपली दुकाने लावू नये, अशा सक्त सूचना दिल्या. नगरपंचायत लांजा यांना आठवडी बाजार तसेच गणेशोत्सव अनुषंगाने लावण्यात येणारा टपरी दुकाने यांना मार्किंग करून जागा निश्चित करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
नगरपंचायत अधिकाऱ्यांन शहरात नो पार्किंग तसेच पार्किंगचे बोर्ड लावणेबाबत सूचना दिल्या. या बैठकीला एसटी महामंडळचे लांजा आगार, नगरपंचायत, व्यापार्र संघटना, भाजी विक्रेते, फेरीवाले, रिक्ष चालक-मालक संघटना, टेम्पो, माल वाहतूक चालक-मालक, खासगी बस् चालक-मालक व ट्रॅव्हल्स एजंट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, ईगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 09/Aug/2025













