गुहागर : तालुक्यातील मळण मधलीवाडी येथील प्रतिभा दिलीप नाटुस्कर यांचे राहते घर दि. २९ जुलै रोजी दुपारी कोसळले. घर कोसळत असल्याचे निदर्शनात येताच या घरात राहणारी माणसे घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, नुकसानग्रस्त घराची शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी यांनी पाहणी केली.
नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात आला आहे. साधारणतः या घराचे अडीच लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. यावेळी घर मालक प्रतिभा नाटुस्कर यांना शासनाने या घराची तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनसेचे पदाधिकाऱ्यांनी केली.
उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी ग्रामसेवकांना फोनद्वारे, घटनेची माहिती, आपण केलेला पंचनामा तलाठी यांनी सादर केला आहे. तसेच शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली. मनसे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी त्वरित तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे संपर्क साधत त्वरित कार्यवाही करावी व नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी केली. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, भर पावसाळ्यात राहते घर पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने नाटुस्कर कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे. या घरातील सर्वजण शेजारील वाडीतील एका घरामध्ये राहात आहेत. गणेशोत्सवाच्या आधी शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त घरमालक प्रतिभा नाटुस्कर यांनी केली आहे. या घराची पाहणी करतेवेळी गणेश नाटुस्कर, मंगेश धामणस्कर, संतोष नाटुस्कर, चंद्रकांत नाटुस्कर, दिनेश नाटुस्कर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 11/Aug/2025













