कडवई : संगमेश्वर देवरूख हा -संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता. यावर्षी या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ते कोल्हापूर या मार्गाला जोड रस्ता व जवळचा मार्ग म्हणून संगमेश्वर देवरूख रोडकडे पहिले जाते.
दोनच वर्षांपूर्वी नवीन बनविण्यात आलेला ह रस्ता आता खड्ड्यांनी भरून गेल आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांन वाहतूक करताना कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सव जवळ येउ लागल्याने तत्पूर्वी तरी या रस्त्याचं डागडुजी होणार का, असा प्रश्न वाहनचालक करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 11/Aug/2025













