लांजा : विषारी द्रव प्यायलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : सालपे (ता. लांजा) येथील वृद्धाने विषारी द्रव प्यायल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. महेश विठ्ठल घाग (वय ६५, रा. सालपे, ता. लांजा, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश घाग यांनी शनिवारी (ता. २) विषारी द्रव प्यायले, त्यांना अस्वस्थ वाटून लागल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी-लांजा येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांना तपासून मृत घोषित केले. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 11/Aug/2025