रत्नागिरी : लांजा-वैभव वसाहत येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ हजार ४४५ रुपयांची विदेशी व गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. संशयिताविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन गजानन कांबळे (वय ४६, रा. बौद्धवाडी, लांजा) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री आठच्या सुमारास लांजा वैभव वसाहत येथील फणसाच्या झाडाखाली एका पडक्या शेडमध्ये निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ हजार ४४५ रुपयांची हातभट्टीची व विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लांजा पोलिस अंमलदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 11/Aug/2025













