राजापूर : तुळसुंदे-मावळतीवाडीत आज, उद्या तिरुपती बालाजी भक्तीवारी

राजापूर : तालुक्यातील तुळसुंदे-मावळतीवाडी येथे श्री बालाजी भक्त मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त तिरुपती बालाजी भक्तीवारी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.१२) पर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात धार्मिक विधी, भजने, प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

सोमवारी (ता. ११) मुख्य आध्यात्मिक सोहळा होणार असून सकाळी ५.३० वा. श्री काडसिद्धेश्वर भक्त मंडळातर्फे काकडा आरती, ९ वाजता भजने व नामस्मरण, दुपारी १२ ते २ वा. महाप्रसाद, ३ वा. सांप्रदायिक सुस्वर भजन, सायंकाळी ४ वाजता श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांचे आगमन, स्वागत यात्रा, दिंडी मिरवणूक व पाद्यपूजन, सायंकाळी ५ वा. अध्यात्मिक सत्संग, प्रवचन व दर्शन, रात्री ८ वा. महाप्रसाद, नामस्मरण व भजन होईल. १२ ला महापूजा, हळदीकुंकू व समारोप, सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते २.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. हळदीकुंकू समारंभ, ७ वा. श्री एल प्रासादिक भजन मंडळाचे भजन, रात्री १० वा. सत्कार, बक्षीस वितरण, ११ वा. डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 11/Aug/2025