राजापुरातील एसटी वाहतूक तीन दिवस बंद

राजापूर : मुख्य रस्त्यावरील कुशे मेडिकलदरम्यान पडलेल्या प्रचंड खड्यांमुळे त्या भागात काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेऊन पहिला टप्पा पूर्ण केला होता. आता उर्वरित टप्प्यात हनुमान गल्ली ते जवाहर चौकातील शिवस्मारक या भागातील पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या कामासाठी रविवारी (ता. १०) सकाळपासून ते १२ ऑगस्टपर्यंत या मार्गावरील एसटी आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 11-08-2025