प्रकाश बेले चिपळूणचे नवे उपविभागीय अधिकारी

चिपळूण : येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांची रत्नागिरी येथील जात पडताळणी विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुंबईहून प्रकाश बेले यांची चिपळूणचे नवे पोलिस उप-अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ते लवकरच आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. गेली दोन वर्षे राजमाने यांनी चिपळूण उपविभागात यशस्वीरीत्या काम केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. यामध्ये शहरातील चोरी प्रकरणे, सावर्डे येथील खून आणि गुहागरमधील खुनाच्या प्रकरणांचा यशस्वीपणे तपास करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 11-08-2025