राजापूर – नाटे येथील तबरेज चौक ते नाटे या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.२९ वाजता ही घटना घडली असून, नाटे सागरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिवाजी पाटील (पोकॉ/४१०) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी जमीन आलिमीया नळेकर (वय ३६, रा. साखरी नाटे) यांनी त्यांची महिंद्रा पिकअप गाडी (क्र. एम.एच. ०७ ए.जे. १५१०) रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली होती, ज्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना आणि इतर वाहनांना धोका निर्माण झाला होता.
या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता ही बाब समोर आली. त्यानंतर, आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा (गु.र.नं. ४८/२०२५) दाखल करण्यात आला आहे. सागरी पोलीस नाटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 11-08-2025












