राजापूर – ओणी ते कोल्हापूरला जाणाऱ्या मार्गावर रायपाटण येथील होळीचा मांड समोर सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.५५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रामदास बाबासो पाटील (वय ३१, पोकॉ/१०१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी योगेश हरिश्चंद्र सावंत (वय ३८, रा. खेडशी, ता.जि. रत्नागिरी) यांनी त्यांच्या ताब्यातील पॅजिओ कंपनीची तीनचाकी रिक्षा (क्र. एम.एच. ०८/व्ही-१०६५) सार्वजनिक रस्त्यावर अशा बेजबाबदारपणे उभी केली होती, ज्यामुळे वाहतुकीला आणि येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेला अडथळा निर्माण झाला.
या अडथळ्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला. यानंतर, आरोपी योगेश सावंत यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा (गु.र.नं. १४६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 11-08-2025












