नेत्रावती एक्स्प्रेस १५ ऑगस्टपासून राजापूर रोड स्थानकावर थांबणार

रत्नागिरी : कोकण रेल्वेने राजापूरवासीयांना येत्या गणेशोत्सवाच्या तोंडावर भेट दिली आहे. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाड्यांना थांबा नसलेल्या राजापूर रोड स्थानकावर दीर्घ पल्ल्याच्या रोज धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला (१६३४५/१६३४६) प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे. यामुळे या स्थानकावरून मुंबई, गोवा आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १६३४५ (लोकमान्य टिळक (ट) तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती’ एक्सप्रेस ही गाडी राजापूर रोड स्टेशनवर रात्री सायंकाळी ७ वा. ४० मिनिटांनी पोहोचेल आणि ७ वा. ४२ मिनिटांनी वाजता पुढे रवाना होईल.

या थांब्याची सुरुवात १५ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे. गाडी क्रमांक १६३४६ (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक (ट) ‘नेत्रावती’ एक्सप्रेस ही गाडी राजापूर रोड स्टेशनवर रोज सकाळी ०७:३८ वाजता पोहोचेल आणि ०७:४० वाजता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होईल. राजापूरवासीय प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी कोकण रेल्वेने पूर्ण केल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 12/Aug/2025