खेड : महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी दोन जणांना अटक केली. हा प्रकार ९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता कालकाई मंदिर परिसरात घडला. पोलिस नाईक वैभव साहेबराव ओहोळ (खेड पोलीस ठाणे) हे डायल-११२ ड्युटीवर असताना भरणे नाका येथून आलेल्या कॉलवर ते घटनास्थळी गेले.
तपासणी दरम्यान आरोपी सागर संभाजी पवार (२९) व संभाजी लक्ष्मन पवार (५२, दोघेही रा. भरणे, गणेश नगर, ता. खेड) हे दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 12/Aug/2025












