स्वच्छ आणि हिरव्यागार दापोलीसाठी ‘जेसीआय मॅरेथॉन २०२५’ चे आयोजन

दापोली : दापोली शहराला स्वच्छ आणि हिरवेगार बनवण्यासाठी जेसीआय दापोलीने ‘जेसीआय मॅरेथॉन २०२५ सिझन-२’ चे आयोजन केले आहे. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता आझाद मैदान, दापोली (शासकीय विश्रामगृहाजवळ) येथे ही मॅरेथॉन होणार आहे. ही केवळ एक धावण्याची शर्यत नसून, आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक संदेश आहे.

या मॅरेथॉनमध्ये दोन गटांचा समावेश आहे:

५ किमी धाव शर्यत: या शर्यतीत पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र बक्षिसे आणि पदके आहेत. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ₹३०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹२०००, आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१००० रोख बक्षीस मिळेल. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे दिली जातील.

२ किमी फन रन: या गटातील विजेत्यांना आकर्षक व्हाउचर आणि पदके देऊन गौरवण्यात येईल.

या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश किंवा नोंदणी शुल्क नाही. ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून, कुटुंबे, मित्र, विद्यार्थी आणि सर्व दापोलीकरांना एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी आणि आयोजनाची माहिती:

स्पॉट नोंदणी: मॅरेथॉनच्या दिवशी सकाळी ७.०० ते ७.४५ या वेळेत नोंदणी करता येईल.

संपर्क: अधिक माहितीसाठी ८४४६४०६६६८ किंवा ८३०८८४९0४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

या उपक्रमाचे आयोजन जेसी फराझ राखंगे (अध्यक्ष २०२५), जेसी प्रा. तेजस मेहता (सचिव २०२५), जेसी डॉ. पीयूष सोनजे (प्रकल्प संचालक), जेसी रोशन वेदक (प्रकल्प अध्यक्ष) आणि जेसी भरत रासाळ (प्रकल्प समन्वयक) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. ‘तंदुरुस्ती, आनंद आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा भविष्यासाठी धावा!’ असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 12-08-2025