पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गट क सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षा २१ सप्टेंबर रोजी होणार असून, या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे, तर २५ ऑगस्टपर्यंत बँक चलनद्वारे शुल्क भरता येणार आहे.
‘एमपीएससी’तर्फे ‘गट क सेवे’ अंतर्गत उद्योग निरीक्षक ३९ पदे, तांत्रिक सहायक ९ पदे, कर सहायक ४८२ पदे, लिपिक-टंकलेखक १७ पदे अशा एकूण १ हजार ६१८ पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी १ जून रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात एकूण २६ हजार ७४० उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांसाठीची मुख्य परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना गट क सेवेतील संवर्गासाठी विकल्प, तसेच लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम नमूद करून अर्ज आणि शुल्क भरावे लागेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 12/Aug/2025













