खेड : खवटीत गोठा कोसळून ३२ हजारांचे नुकसान

खेड : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका खवटी गावातील शेतकरी महादेव पांडुरंग गावणकर यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. रविवारी दि. १७ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या शेतातील गोठा अचानक कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच भरणे मंडळ अधिकारी श्री. उमाकांत देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला. हा पंचनामा खवटी ग्राम महसुल अधिकारी श्रीमती दिपाली शिंदे यांनी करून घेतला. या पंचनाम्यात गोठा कोसळल्यामुळे अंदाजे ३२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये बांधकाम साहित्याचे तुकडे, पत्रे व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने या घटनेची नोंद घेऊन शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत शेतकऱ्यास मदत मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 18/Aug/2025