सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : गोव्याच्या सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा येथे अनधिकृतपणे वास्तव्य करत असलेल्या युरी वॅल्डीमोरीविझ मोजको (वय ४४, रा. रशिया) या रशियन पर्यटकाला अमली पदार्थांची तस्करी करत असल्याच्या संशयावरून सावंतवाडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
मात्र, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले नसल्याने पोलिसांकडून त्याला आरोंदा येथे अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पोलिस तपासणीवेळी कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. ही कारवाई पोलिसांकडून मंगळवारी सकाळी करण्यात आली असून, युरी याला ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
युरी हा रशियन पर्यटक गोवा-हरमल येथे आला होता. त्याला महाराष्ट्रातील आरोंदा हे गाव जवळ असल्याने तसेच शिरोडा, वेळागर, रेड्डी येथील बीच जवळ असल्याने त्याचा वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला होता. आरोंदा येथील स्थानिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आरोंदा येथे गेले. त्यांनी या रशियन पर्यटकाला ताब्यात घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 20-08-2025














