रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त आरटीओ कार्यालयात बैठक

रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटना, बस वाहतूकदार व एसटी महामंडळ यांची संयुक्त बैठक आरटीओ कार्यालयातर्फे सोमवारी घेण्यात आली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्ध करपे यांनी मार्गदर्शन केले. सर्वांना वाहतूक व्यवस्थेबाबत सूचना दिल्या.

बैठक आरटीओ कार्यालयात घेण्यात आली. वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस व रेल्वे पोलीस अधिकारी यांच्या समवेत या बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. यावेळी रिक्षावाल्यानी अवाजवी भाडे आकारू नये, प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करून नये, तसेच शिस्तबद्धरीतीने वाहतूक करावी, याबाबत सूचना दिल्या.

बस वाहतूकदार यांनी बसमधील आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. चालक मद्यप्राशन करून पुरेशी विश्रांती न घेता आणि धोकादायक पद्धतीने बस चालावणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात यावी असे सांगितले. एस टी महामंडळ यांनी रेल्वेच्या वेळापत्रकानुसार त्यांच्या बस फेऱ्यांचे नियोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनीही मार्गदर्शन केले.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात भाविक मोठ्या संख्येने येत असतात भाविकांचा प्रवास सुरक्षित, विनाअडथळा व सुखकर व्हावा याकरिता सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, तसेच कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद घाग, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर जाधव, रेल्वे पोलिस वरिष्ठ निरीक्षक सतीश विभुते, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, त्याचबरोबर सर्व रस्ता कंत्राटदारांचे प्रतिनिधी, बस वाहतूकदार संघटना, जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी, रुग्णवाहिका सेवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 20/Aug/2025