सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.

पण, आता बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अधीक सक्रीय झाले आहे. सलमानदेखील स्वतःच्या सुरक्षेसाठी अलर्ट झाला असून, त्याने नवीन बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खनने बुलेट प्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. अभिनेत्याकडे सध्या लँड क्रूझर आणि निसान पेट्रोल कार होती. आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने ही नवीन कारदेखील दुबईहून आयात केली आहे.

सलमानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असून, बाबा सिद्दिकींची सलमानसोबतची मैत्री या हत्येचे कारण सांगितले जात आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानवर हल्ला होऊ शकतो. सततच्या धमक्यांमुळे सलमान नाराज तर आहेच, शिवाय त्याचे कुटुंबीयही त्याच्यासाठी घाबरले आहेत.

धमक्यांना न जुमानता सलमानने सुरू केले ‘बिग बॉस 18’चे शूट
धमक्या मिळाल्यानंतरही सलमान कामावर परतला आहे. तो 17 ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस 18’ च्या सेटवर पोहोचला आणि शुक्रवारी ‘वीकेंड का वार’चे दोन्ही भाग शूट केले. यावेळी बिग बॉसच्या संपूर्ण टीमला शूट संपेपर्यंत सेटवर थांबण्याचा आदेश देण्यात आला होता. शुटिंगदरम्यान सेटवर 60 सुरक्षा रक्षकांना ठेवण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 19-10-2024