देवरूख-मार्लेश्वर रस्त्यावर झाडी

देवरूख : देवरूख मार्लेश्वर रोडवर नेहमीच असंख्य भाविकांची आणि पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांची वर्दळ असते. आंगवली ते मारळदरम्यान काही भागांत रस्त्यावर आलेली झाडी वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी फार धोकादायक ठरत आहे.

काही ठिकाणी वळणावर झाडी आल्यामुळे वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या ४ दिवसांवर गणेशोत्सव येत असून, आजूबाजूच्या गावात मुंबईकर चाकरमान्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर पाहायला मिळते. तरी कुठला अपघात होण्याआधी संबधित यंत्रणांनी ही रस्त्यावर आलेली झाडी तत्काळ हटवावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 23/Aug/2025