चिपळुणातील महिलेला १६ लाखांचा ऑनलाईन गंडा

चिपळूण : चिपळुणातील एका गृहिणीला तब्बल १६ लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची फिर्याद सुमेधा बाष्टे (३३, रा. कापसाळ) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, दि. १४ एप्रिल ते २२ मे या दरम्यान त्यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी २१ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनहिता मेहता व भरत गाला या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या दोन आरोपींनी सुमेधा बाष्टे यांच्याकडून शेअर्स व आयपीओकरिता तसेच विविध करासाठी १६ लाख ३९ हजार ४८८ रूपये ऑनलाईन पद्धतीने घेतले व त्यातील ४६ हजार ५६५ रूपये परत फिर्यादी यांच्या स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या खात्यात दिले; मात्र त्यानंतर आपण फसल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 23/Aug/2025