रत्नागिरी : बेलबागमध्ये बेकायदेशिरपणे जुगार चालवणाऱ्यांवर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील बेलबाग येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी १.३० वा. करण्यात आली. संजोग शशिकांत मयेकर (३६, रा. मयेकरवाडी सोमेश्वर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदार अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार शनिवारी दुपारी संशयित हा बेलबाग येथे एका घराच्या पाठीमागील बाजूस जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण १ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जवळ बाळगून जुगार खेळ चालवत होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 25/Aug/2025