संगमेश्वर : फणसट – आगरेवाडी रस्त्याची दुरवस्था

संगमेश्वर : परतीच्या पावसाने संगमेश्वर तालुक्यातील फणसट रायनाकवाडी ते तुळसणी आगरेवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

रस्त्यावर सुमारे ४ ते ५ फुटापर्यंत भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाडीत सध्या वास्तव्यास असलेल्या वयस्कर ग्रामस्थांना प्रथमोपचार घेण्यासाठी डॉक्टरकडे जाणेही जिकिरीचे झाले आहे. हा रस्ता देवरूख सांगवे, फणसट, रायनाकवाडी ते तुळसणी आग्रेवाडीमार्गे रत्नागिरी राज्यमार्गाला मिळतो. सध्याची परिस्थिती पाहता या रस्त्यावरून चालत जाणेही कठीण झाले आहे. केव्हाही हा रस्ता खचण्याचा धोका आहे. शासनाने लवकरात लवकर पाहणी करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी रायनाकवाडीतील बाळगोपाळ मित्रमंडळाने केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 19-10-2024