रत्नागिरी : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) रत्नागिरी शाखेकडून करबुडे गावासाठी मानाचा विमाग्राम पुरस्कार व एक लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
एलआयसी शाखेच्या प्रबंधक मालवणकर, विकास अधिकारी चंद्रशेखर पटवर्धन, करबुडे गावचे विमा प्रतिनिधी वैभव धनावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. गावच्या सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिष्मा गोताड, ग्रामपंचायत सदस्य, करबुडे गावचे गावकर, माजी सरपंच व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. विमाग्राम करण्यासाठी विमा प्रतिनिधी वैभव धनावडे यांनी पाठपुरावा केला व पहिलाच पुरस्कार मिळवण्यात यश प्राप्त करून घेतले. याबद्दल माजी सरपंच सुनील खापरे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 26-08-2025














