रत्नागिरी : जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी एकूण सुमारे ७५.६८ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण १ हजार ७४ कामे प्रस्तावित आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
जनसुविधा योजनेंतर्गत सुमारे ७५.६८ कोटी निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात एकूण १,०७४ कामे प्रस्तावित आहेत. सर्वाधिक निधी रत्नागिरी तालुक्याला (२१.९२ कोटी रुपये आणि ३०७ कामे) मिळणार आहे. त्या खालोखाल संगमेश्वर (११ कोटी, १५४ कामे) आणि दापोली (११.८५ कोटी, १३५ कामे) या तालुक्यांना निधी मिळणार आहे. याशिवाय मंडणगड (४१ लाख, २७कामे) आणि गुहागर (३.५९ कोटी, १०५ कामे) तालुक्यालाही निधी मिळणार आहे.
… ही कामे होणार
या निधीमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. या निधीतून उत्तम पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण, गटार व्यवस्थापन, पथदिव्यांची सोय यासारख्या जनसुविधांमध्ये सुधारणा होईल. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमुळे गावागावांत शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.
नागरी सुविधा योजनेमुळे 3 शहरातील उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे, बाजारपेठांची दुरुस्ती यांसारख्या सुविधांमध्ये वाढ होईल
पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार असून, सुधारित पायाभूत सुविधांमुळे पर्यटकांना जिल्ह्यात येणे अधिक सोपे होईल. या सर्व बदलांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण सामाजिक विकासाला गती मिळेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:58 PM 30-Aug-2025













