Ratnagiri : वाटदमधील हातभट्टीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-किंजळेवाडी परटवणे रस्त्यालगत आंब्याच्या झाडाखाली विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४८० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. जयगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिश्चंद्र काशिराम किंजळे (वय ५४, रा. वाटद-किंजळेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:00 PM 01-Sep-2025