सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलिसांना बंदोबस्ताची ड्युटी असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना १५ ते २५ नोव्हेंबर या काळात सुट्या व रजा मिळणार नाहीत. पोलिस महासंचालक कार्यालयाने न्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मंगळवारपासून (ता. २२) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून त्यासाठीही पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. ५ ते १८ नोव्हेंबर या काळात प्रचारसभा, कॉर्नर बैठका होतील, २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होईल. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, राज्य राखीव पोलिस बलाचेही कर्मचारी असणार आहेत. राज्यातील जवळपास दीड लाख पोलिस, ४७ हजार होमगार्ड व राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्यांनाही विविध ठिकाणी बंदोबस्त दिला जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलिसांचा ज्यादा बंदोबस्त असणार असून काही ठिकाणी नवप्रविष्ठ पोलिसांनाही बंदोबस्ताची ड्युटी दिली जाणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून सुरु आहे.
निवडणूक कामात शिक्षकांच्या दिवाळी सुट्या
निवडणुकीसाठी नेमलेल्या सर्वच शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पार पडणार आहे. दरम्यान, शिक्षकांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी असणार आहे. पण, त्यांना येत्या शनिवार, रविवारी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा एका प्रशिक्षणाला उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या इलेक्शन कामातच जाणार आहेत.
पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार १५ ते २५ नोव्हेंबर या काळात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या सुट्वा, रजा रद्द करण्यात आल्या आहेत. लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. – अजित बोन्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 21-10-2024














