खेड : तालुक्यातील लवेल येथे गणपती आरतीस बोलवायला गेले असता एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार १ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडला.
मृत व्यक्तीचे नाव संजय श्रीपत रेमजे (५४, मूळ रा. लवेल तळेकरवाडी, सध्या रा. दहीसर, अशोकवन ईस्ट, मुंबई) असे असून ते लवेल येथे गणपती उत्सवासाठी आले होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाडीतील अतुल शंकर चांदीवडे हे संजय रेमजे यांना गणपतीची आरतीस बोलविण्यासाठी गेले असता ते आपल्या बेडरूममध्ये उपड्या स्थितीत पडलेले दिसले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता हालचाल न झाल्याने तातडीने ग्रामस्थांना बोलावून खाजगी वाहनातून रतनबाई घरडा हॉस्पिटल, लवेल येथे नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासन सायंकाळी ७.३६ वाजता त्यांना मत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 05/Sep/2025












