Anant Chaturdashi : जिल्ह्यात ३६ हजार घरगुती व ६१ सार्वजनिक गणरायांना आज निरोप

रत्नागिरी : मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात गणेशोत्सव भक्तिभावाने सुरू असलेल्या भाद्रपदी गणेशोत्सवाची शनिवारी दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सांगता होत आहे. जिल्ह्यात ३६ हजार घरगुती, ६१ सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मागील दहा दिवस शहर व ग्रामीण भागातही आरत्या, भजने यांच्यामुळे आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. मुंबई, पुण्यातून चाकरमानीही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पावणेदोन लाख घरगुती गणरायांची मूर्तीची स्थापना झाली होती. गौरी गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचीही परतीची पावले पडू लागली आहेत. शनिवारी दहा दिवसाच्या गणरायांचे विसर्जन होणार आहे. जवळपास ३६ हजार घरगुती आणि ६१ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन होणार आहे. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत विसर्जनाची वेळ असून, पोलिसांनी विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवताना विसर्जनासाठी नदी, तलाव, समुद्रात उतरणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 06-Sep-2025