देवरुख : संगमेश्वर डिंगणी रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. हा रस्ता महत्त्वाचा आहे. संगमेश्वर डिंगणी या खाडीपट्ट्यातील रस्त्यावरून १५ गावातील लोक प्रवास करतात. जवळचा रस्ता असल्याने गणपतीपुळ्याकडे जाणारे भक्तगण या रस्त्यानेच जातात. याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यावर चिखलाचे कमालीचे साम्राज्य आहे. त्यात भर म्हणून सीएनजी ची अवजड वाहने दोन्ही बाजूंना उभी करून ठेवलेली असतात. त्यांनी तर चिखलच होत आहे.
रस्त्यावरून गाडी चालवणे अवघड झाले आहे. सगळ्या रस्त्यावर चिखल. सगळीकडे खड्डेच खड्डे. खड्ड्यामध्ये गाडीचे चाक पूर्ण बुडते. रस्त्यावरून प्रवास करताना जणू काय आपण होडीतच बसलो आहे असे वाटते
या रस्त्यावरून वाहनाने किंवा पायी जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच आहे. पायी चालत जायला साइट पट्टीच राहिलेली नाही. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाने, लोकप्रतिनिधी, गावपातळीवर असणारे त्याचे कार्यकर्ते यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी. सीएनजी अवजड वाहनांची पार्किंग व्यवस्था अन्य कुठेतरी करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 08/Sep/2025












