खेड : भोस्ते-जलालशहा मोहल्ला येथून दुचाकी लंपास

खेड : खेड तालुक्यातील भोस्ते-जलालशहा मोहल्ला येथून ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी (bike) अज्ञाताने लंपास केली. या प्रकरणी गुरुवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जहीर जाकीर शेख यांच्या मालकीचे जलालशहा मोहल्ला येथे दुकान आहे. त्यांच्या काका नासीर सत्तार शेख यांनी दुचाकी (एम.एच. ०८/ए.यु. ७१६६) दुकानासमोर उभी करून ठेवली होती. चोरट्याने दुचाकी चोरी केल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानक गाठून तक्रार नोंदवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 21-10-2024