Devrukh : रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत भाजप पदाधिकारी आक्रमक

साडवली : देवरूख शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांची भेट घेतली. पावसाळ्यानंतर तातडीने देवरूखमधील सर्व रस्ते सुस्थितीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आतापासूनच करावी. त्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता कशी करून देता येईल, यावरदेखील चर्चा करण्यात आली.

माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाची रस्त्याची डागडुजी करण्यात केलेल्या दिरंगाईमुळेच देवरूखवासीयांना खराब रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले. आठ दिवसांत सर्व खराब रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल तयार करण्यात येईल तसेच पावसाळा संपताच रस्त्याच्या नूतनीकरणास सुरुवात करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात येतील, असे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी सांगितले.

देवरूखमधील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेला संगमेश्वर-साखरपा रस्ता (कांजिवरा रस्ता), देवळे-मेघी रस्ता (परशरामवाडी रस्ता) या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उपविभागीय अभियंता वैभव जाधव यांची भेट घेतली व तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुशांत मुळे, भाजप पदाधिकारी तुकाराम किर्वे, माजी उपनगराध्यक्ष वैभव कदम, भाजप युवक शहराध्यक्ष पुष्कर शेट्ये, धनंजय लोध, प्रशांत बडद उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:57 PM 10/Sep/2025