पुणे : दिवाळीच्या निमित्ताने सध्या विविध बाजारपेठांमधील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा उत्साह सराफ बाजारातही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव चढे राहिले आहेत. यानंतरही ग्राहकांकडून खरेदी वाढत आहे. दिवाळीमुळे खरेदी आणखी वाढणार आहे.
दिवाळीनंतर लग्नसराईचे दिवस येतात, त्यासाठीही सोने-चांदीसह इतर दागिन्यांची खरेदी वाढते, अनेक ग्राहक दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने बाळगून होते. भात काही कमी न झाल्याने काही सोने खरेदीदारांची थोडी निराशा झाली. आगामी काळात सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दागिन्यांची खरेदी कायम आहे.
याशिवाय गुंतवणुकीच्या उद्देशानेही सोन्याची खरेदी होत आहे. नियमित गुंतवणूकदारांकडून येत्या काळातही खरेदी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीचा इस्त्राइल व पॅलेस्टाराान यांच्यातील युद्धामुळे निर्माण आलेल्या स्थितीनंतरही सोन्याच्या भावातील तेजी कायम राहू शकते, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
या दागिन्यांना मागणी
दिवाळीच्या निमित्ताने वेढणी, सोनसाखळी, बांगड्या, पाटल्या, मंगळसूत्र, कर्णफुले, ब्रेसलेट अशा मोठ्या दागिन्यांच्या खरेदीला पसंती आहे. मंगळसूत्रांचे अनेक पर्याय सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे चांदीची जोडवी आणि इतर दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
गेल्या महिनाभरात सोने आणि चांदीचा भाव अचानक वाढला. नागरिकांचा सोन्यावर असलेला विश्वास वाढत चालल्याने खरेदी वाढती आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या भावात २५ टक्क्यांहून जास्त वाढला आहे. त्यामुळे आता भाव एकदम खूप कमी होण्याची शक्यता कमी आहे. सध्या दिवाळीच्या निमिताने सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बाजारात उत्साह दिसून येत असून ग्राहक पारंपरिक दागिन्यांसह विविध स्वरूपाचे दागिने खरेदी करीत आहेत. – अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 21/Oct/2024














