Ratnagiri : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सीईओ अजय चव्हाण बेस्ट सीईओ अर्थविश्व पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बाळकृष्ण चव्हाण यांना लोकसत्ता संघर्ष यांच्यावतीने सन २०२४- २५चा बेस्ट सीईओ अर्थविश्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अजय चव्हाण हे नुकतेच बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांची लोकसत्ता संघर्ष या संस्थेकडून बेस्ट सीईओ अर्थविच पुरस्कार २०२४-२५ करीता निवड करण्यात आली होती.

हा पुरस्कार नुकताच अहिल्यानगर येथे अशोक झोटींग यांच्याहस्ते व करण नवले, राम नळकांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लोककल्याणकारी योजना बँकेचे अध्यक्ष कृषीभुषण डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव व बँकेच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने राबवून यशस्वी वाटचाल करण्यामागे अजय चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल लोकसत्ता संघर्ष या संस्थेने घेत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

अजय चव्हाण यांच्या अंगी शिस्त, परीश्रम, गुणवत्तेचा ध्यास, सहकाराची तळमळ ठायीठायी आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचे मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकारात सर्वोत्कृष्ठ ठरवले आहे. चव्हाण हे सहकारात तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर लोकसत्ता संघर्ष या संस्थेच्यावतीने जिल्हा बँकांमधून राज्यस्तरीय बेस्ट सीईओ अर्थविश्व
असून त्यांनी आपल्या कामकाजाच्या माध्यमातून स्वतंत्र ठसा उमटवला आहे.

सहकार क्षेत्रात बँकेच्या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना बँकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत केली आहे. सहकार क्षेत्राबरोबरच आर्थिक क्षेत्राला सामाजिक कार्याची जोड देऊन जिल्हा बँकेला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या कालावधीत बँकेने सन २०२३ -२४ करीता आपल्या सभासदांना ३०% विक्रमी लाभांश वितरीत केला आहे. चव्हाण यांना राज्यस्तरीय बेस्ट सीईओ अर्थविश्व पुरस्कार ने सन्मानित केल्यामुळे बँकेचे अध्यक्ष कृषीभुषण डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष वाबाजीराव जाधव व सर्व संचालक मंडळ सदस्य, बँकेचे नवनियुक्त सीईओ डॉ. सुधीर गिम्हवणेकर तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे कौतूक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 15/Sep/2025