आई कुठे काय करते घेणार प्रेक्षकांचा निरोप ? नव्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली!

मुंबई : टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चॅनलकडून वेगवेगळे प्रयत्न होत असतात. प्रेक्षकांचे मन ओळखताना कोणती मालिका आवडेल ती दाखवण्याचा सतत प्रयत्न होत असतो. सध्याची टीआरपी ची लिस्ट पाहता स्टार प्रवाह हे चॅनल अग्रहस्थानी आहे. या चॅनल वरील सर्व मालिका सुपरहिट झाल्या आहेत. मात्र आता त्यातील काही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवर नवीन मालिकांचे प्रोमो दाखवले गेले. त्यातील एक होती आई आणि बाबा रिटायर होत आहेत. या मालिकेमध्ये अभिनेत्री निवेदिता जोशी आणि अभिनेते मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका पाहायला मिळणार असल्याचं प्रोमो वरून समोर आलेलं. मात्र ही मालिका कधी पाहायला मिळणार हे गुलदस्त्यात ठेवलेलं. आता ही मालिका सुरू होण्याची तारीख आणि वेळ समोर आली आहे.

येत्या २ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी २:३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. दुपारी २:३० ची वेळ मिळाल्याने कोणती मालिका बंद होणार याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. सध्या स्टार प्रवाहवर २:३० वाजता आई कुठे काय करते ही मालिका लागते. तर दोन वाजता लग्नाची बेडी ही मालिका लागते. १:३० वाजता मुरांबा तर १ वाजता शुभ मंगल या मालिका पाहायला मिळतात. या चारही मालिकांचे कथानक सध्या रंजक वळणावर आले असल्याने नक्की कोणती मालिका निरोप घेणार याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.

त्यातल्या त्यात लग्नाची बेडी आणि आई कुठे काय करते या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता जास्त आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध आणि संजना यांचे कोर्टात पितळ उघडे पडले आहे. त्यांनी कसे आई-अप्पांना फसवून बंगला आपल्या नावावर करून घेतला हे सिद्ध झाल्याने त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. तर लग्नाची बेडी या मालिकेत सुद्धा मधुराणीची कारस्थान रत्नपारखी कुटुंबाच्या समोर आल्याने तिला जेलमध्ये टाकले आहे. दोन्हीही मालिका उत्कंठावर्धक वळणावर असल्याने कोणती मालिका निरोप घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान निवेदिता सराफ या सिने इंडस्ट्रीत ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्या कलर्स मराठी वाहिनीवर भाग्य दिले तू मला या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत होत्या. तर अभिनेते मंगेश कदम हे स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत विठ्ठल कानिटकर हे पात्र साकारत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 21-10-2024