Ratnagiri patwardhan highschool : पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे निबंध स्पर्धेत यश

रत्नागिरी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सोमवारी (ता. १५) झाला. या स्पर्धेमध्ये पटवर्धन हायस्कूलच्या पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

समृद्धी शिरगावकर हिने प्रथम व दुर्वा चव्हाण हिने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन लोकमान्य सोसायटीच्या कार्यालयामध्ये सन्मानित केले. मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, पर्यवेक्षिका शिरोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी हर्डीकर, कनोजे व गांधी यांच्या नियोजन समितीने काम पहिले. संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी गुणवंत मुलांचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 17/Sep/2025