Khed : नवनिर्माणमध्ये रंगला कला महोत्सव

खेड : नवनिर्माण कला संस्थेचा कला महोत्सव स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात पार पडला. विविध कला स्पर्धांमध्ये सहभागी तरुणाई अभिनय आणि सुरांमध्ये रंगून गेली होती. यामध्ये शिवम कदम याच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक मिळाला, तर मुस्कान खेडेकर हिला दुसरा क्रमांक देण्यात आला.

महोत्सवावेळी आयोजित चित्रकला स्पर्धेत समीक्षा गोरे हिने प्रथम क्रमांक पटकावत प्रेक्षकांची दाद मिळवली. सई दांडेकर हिने द्वितीय, तर अभिज्ञ भानसे याने तृतीय क्रमांक मिळवला. एकपात्री अभिनयामध्ये मंदार मोरे यांच्या अप्रतिम सादरीकरणाने विजेतेपदाचा मान पटकावला. शुभम केसकरने उपविजेतेपद, तर जितेश गोरेने तृतीय क्रमांक मिळवला.

कराओके गीतगायनमध्ये मल्हार देवघरकर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. अंगद कुमार द्वितीय, तर पवन सौंदरे तृतीय क्रमांकावर विराजमान झाले. स्वराज पाटील व पुष्कर आवळे यांना उत्तेजनार्थ गौरवण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष गौरी पुळेकर यांच्यासह शरद शिर्के, कुंदन सातपुते, अमोल बुटाला, सतीश चिकणे, शमशुद्दीन मुकादम, रोहन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून निळकंठ गोखले, सांची वानखेडे व विनय माळी यांनी जबाबदारी पार पाडली. संस्थाध्यक्ष अनुज जोशी, उपाध्यक्ष अंकुश विचारे, सचिव स्वरा जोशी, खजिनदार सिकंदर बांगी तसेच कार्यकर्ते मंगेश पवार, राजेंद्र खेडेकर, अर्बीना वावघरकर, साक्षी शिंदे आदींच्या परिश्रमांमुळे सोहळा यशस्वी झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 17/Sep/2025