Lokshai Din : जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ ऑक्टोबरला

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनासाठी नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 17/Sep/2025