साडवली : मुंबई विद्यापीठाच्या वारसा भाषा व सांस्कृतिक अध्ययन उत्कृष्टता केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन व विद्यापीठ पुरस्कार वितरणावेळी देवरूखचे रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी किरेन रिजिजू यांची काढलेली पोट्रेट रांगोळी आकर्षण ठरली. यावेळी अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी रहाटे यांचे कौतुकही केले.
मुंबई विद्यापीठाच्या या कार्यक्रमाला अल्पसंख्याक कार्य व संसदीय कार्य विभागाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. अजय भामरे व कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित होते. यावेळी रिजिजू यांनी रहाटे यांच्याशी चर्चा करताना रांगोळी कलेबाबतची माहिती जाणून घेतली.
गेली अनेक वर्षे मुंबई विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांसाठी अतिथीच्या पोट्रेट रांगोळ्या रहाटे यांनी साकारणे हे एक समीकरणच बनले आहे. यापूर्वीही त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व रमेश बैस, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, डॉ. वीरेंद्र कुमार, मंत्री चंद्रकांत पाटील, सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर, अभिनेते अशोक सराफ, शिवाजी साटम, मनोज जोशी अशा दिग्गजांच्या पोट्रेट रांगोळ्या काढल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 17/Sep/2025












