Gogate Jogalekar College : ‘गोगटे जोगळेकर’च्या विद्यार्थ्यांची शिरगाव कृषी संशोधन केंद्रास भेट

रत्नागिरी : शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विषयातील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांच्यावतीने कृषी संशोधन केंद्र शिरगाव येथे क्षेत्र भेटीचे अध्ययन करण्यात आले. तसेच समाजशास्त्र विषयाच्या विद्याथ्यांकडून स्थानिक भात शेती करण्याऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात अध्ययन करण्यात आले.

शिरगाव कृषी संशोधन केंद्रातील कृषी पर्यवेक्षक डॉ. नीलेश सोनोने यांनी विद्यार्थ्यांना भाताचे वाण, शेंगदाणा वाण, कृषी संशोधन केंद्राचे कार्य, शेतकऱ्यांना कोणते मार्गदर्शन केले जाते याची माहिती देऊन सोबत विद्यार्थांच्या विविधप्रश्नांची उत्तरे दिली.

राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व समाजशास्त्र विभागातील विद्यार्थांनी भात उत्पादक ८३ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून शेती क्षेत्र, लागवड पद्धती, उत्पादन, शासकीय योजना, माती परीक्षण अशा विविध विषयांची माहिती संकलित केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व विद्यार्थांचे कौतुक केले. सदर उपक्रमासाठी कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे तसेच श्रेयस रसाळ, गौरांग नामजोशी, आर्यन जमादार यांनी नियोजन केले. यासाठी स्वरूप भाटकर यांनी विशेष सहाय्य केले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 17/Sep/2025