चिपळूण : भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नुकतीच कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक परिमल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल भोसले यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी परिमल भोसले यांचे खास करून अभिनंदन केले आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला रात्री अपरात्री धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच खासदार नारायण राणे यांच्यासह राणे कुटूंबीयांशी त्यांची जवळीक आहे. नगरसेवक पदी असतांना परिमल भोसले यांनी चिपळूण शहराच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तर भाजपा चिटणीस म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. नगरसेवक अथवा भाजपा चिटणीसपदी कार्यरत असतांना जनतेच्या हितार्थ नेहमीच आग्रही राहिले आहेत. प्रसंगी आंदोलनात आक्रमकपणे भूमिका मांडत जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला आहे. याची दखल घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी परिमल भोसले यांच्यावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देतांना भोसले यांनी म्हटले आहे की, सर्वांनी माझे मनापासून अभिनंदन करून माझा आनंद द्विगुणीत केला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची योग्य ती दखल घेतली जाते हे हे आज सिद्ध झाले. जिल्हा पातळीवर काम करत असताना मी पक्षाची ध्येये धोरणे सांभाळून व सर्वांना बरोबर घेऊन निश्चितपणाने काम करेन, अशी ग्वाही भोसले यांनी यावेळी दिली. मला दिलेले पद हा माझा बहुमान नसून पार्टीच्या पदाचा बहुमान आहे, याची जाणीव मला आहे. तरी या पदाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या कार्यकाळामध्ये निश्चितच करेन, असे सांगतांना वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन, अशी ग्वाही परिमल भोसले यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 17-09-2025












