Chiplun : चिपळुणात डॉक्टरांचा उद्या बंद; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

चिपळूण : राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभाग सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण केलेल डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिक कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यास मान्य दिली आहे. त्यास इंडियन मेडिक असोसिएशनने तीव्र विरोध केला याविषयी दाद मागण्यासाठी १८ रोजी सकाळी ८ ते १९ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत केवळ
अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती आयएमए चिपळूणचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चिपळूण शहरातील सावरकर सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. अरविंद पोतदार, डॉ. गणेश जोशी, डॉ. वनिता सानप, डॉ. मनीषा वाघमारे उपस्थित होत्या. डॉ. जबले म्हणाले, सीसीएमपी कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करून घेण्यासाठी निर्देश राज्य सरकारने दिले आहे. हा निर्णय आरोग्यसेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.

मुळात एमबीबीएस हा कोर्स साडेपाच वर्षांचा असून, त्यात १९ विषयांचा परिपूर्ण अभ्यास, सखोल क्लिनिकल अनुभव, एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. त्याउलट सीसीएमपी कोर्स केवळ १ वर्षाचा कोर्स आहे. आठवड्यातून २ दिवस तो शिकवला जातो. या कोर्समधून आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील आवश्यक ज्ञान, कौशल्ये व निर्णयक्षमता विकसित होणे शक्य नाही. आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस व त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे. होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या उपचार पद्धतीला आयएमएचा कोणताही विरोध नाही; परंतु महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये त्यांची नोंदणी करण्यास विरोध आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 17/Sep/2025