खेड : भरणेनाका येथील डाव्या बाजूला गोवा – मुंबई सर्व्हिस रोडजवळील आदर्श शाळा क्रमांक १ समोर अॅपे रिक्षा (एमएच ०८, बीसी ०६१८) उभी केल्याने खेड पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला. नरेश महेंद्र धोत्रे (वय २५, रा. आपेडे, खेड) असे चालकाचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. या वाहनामुळे सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिस शिपाई तेजस्विनी जाधव यांनी कारवाई केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 17/Sep/2025












