रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा गावात आज पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला. कोळसा वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने सहा गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाली असून, चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात दोन चारचाकी गाड्या आणि चार दुचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात काही तासांपूर्वीच घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबबळ उडाली आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.











