लांजा : सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीक्षेपकाबाबत अटी व शर्ती, दुर्गा माता विसर्जन मिरवणुकीकरिता आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन परवानगी घेणे, उत्सवा दरम्यान कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संबंधित मंडळाचे प्रमुख यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी, असे आवाहन लांजा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवरील या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, उत्सव काळात अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास लांजा पोलीस ठाण्याकडे संपर्क साधावा व आपत्कालीन ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. उत्सव शांततामय वातावरणात साजरा करावा, असेही आवाहन पोलीस निरीक्षक बगळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 18/Sep/2025












