साडवली : देवरूखनजीक साडवली कासारवाडी येथील राजन धने यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या भागात सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बिबट्या दिसून आला. या बाबतची माहिती येथील पोलीस पाटील यांनी वन विभागास दिली. त्यानंतर काही तासांत मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन आवश्यक साहित्यासह वन विभाग जागेवर जाऊन खात्री करता बिबट्या हा वन्य प्राणी जागेवर एकाच ठिकाणी बसलेला असल्याचे आढळून आले. त्याला स्टिक साहाय्याने व जाळी टाकून सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. या बबट्याला जेरबंद केल्यानंतर येथील ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानत सुटकेचा निश्वास टाकला.
हा बिबट्या याची सहायक आयुक्त पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 युवराज शेटे व संतोष वाळवेकर वन्यजीव पशुवैद्यक कोल्हापूर वन विभाग कोल्हापूर यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली. सदर वन्य प्राणी बिबट्या नर जातीचा असून तो 3 ते 4 वर्षांचा आहे. त्याच्या मागील डाव्या पायाच्या मांडीला जखम असून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याचबरोबर उपचार केले. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहायक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशा घटनांवेळी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421 वर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 18-09-2025












