Devrukh Gramin Hospital : देवरुख ग्रामीण रुग्णालयात उद्या महाआरोग्य शिबीर

देवरुख : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त देवरुख येथे १९ रोजी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा देवरुख व डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर देवरुख ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आले
आहे.

या शिबिरात शस्त्रक्रिया, कॅन्सर सर्जरी, केमो थेरपी, मुतखडे, प्रोस्टेट ग्रंथी, सांध्यावरील शस्त्रक्रिया, जिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, मेंदूतील रक्तस्त्राव, मेंदूतील गाठी, ब्रेन ट्यूमर, दुर्बिणीद्वारे मणक्यातील सरकलेल्या चकतीवरील शस्त्रक्रिया, नाकाचे हाड वाढणे, सायनस शस्त्रक्रिया, कानाच्या हाडाची शस्त्रक्रिया, अद्ययावत
रेडिएशन थेरपी, डायलेसीस सुविधा, टॉन्सील, पेट स्कॅन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नॉर्मल व सिझेरिअन डिलिव्हरी, गुडघे आणि खुबा बदलण्याची शस्त्रक्रिया, मणक्यातील ट्युमरवरील शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयामध्ये केल्या जातात.

या शिबिरात उपस्थित तज्ञ डॉक्टर जनरल सर्जन, स्त्री रोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, अस्थिरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ज्ञ, नाक व घसा तज्ञ, फिजिओथेरेपी यांची देखील तपासणी केली जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांनी मागील आजारांच्या तपासणीचे रिपोर्ट व चालू औषधे घेऊन येणे, रुग्ण आढळल्यास केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गरजू रुग्णांनी सदर शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, युवा मोर्चा शहराध्यक्ष पुष्कर प्रदिप शेट्ये केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 18/Sep/2025