खेड : खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करताना एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भरणे (ता. खेड) परिसरात महामार्गालगत एक व्यक्ती बसून दारू पित असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून खेड पोलिसांनी छापा टाकला असता गिरधी बहादुर (रा. रामवर बुजुर्ग, रामकोल्हा, जि. कुशीनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. भरणे, ता. खेड) हा दारू पिताना आढळून आला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 18/Sep/2025












